International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 2 (March-April 2025) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

Study of Changing Cropping Pattern in Western Vidarbha

Author(s) Mr. Purushottam Rangrao Chate
Country India
Abstract गोषवारा :-
भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर आदिमानव जंगलातच राहून कंदमुळे आणि फळे खाऊन शिकार करून जगत होता.त्यांना इतर सजीवांपेक्षा बुद्धीची देणगी जास्त असल्याने त्याच्यात दिवसेंदिवस विकास होवू लागला. ऋषीमुनींच्या अगोदरच कृषिसंस्कृतीचा जन्म झाला. ऋषीमुनींनी आपल्या आश्रमाच्या आसपास ऋषीकृषी सुरु केली.कृषिसंस्कृतीचा खरा विकास ऋषीमुनींच्या काळापासून सुरु झाला.नदीकिनारी त्या काळातल्या कृषिमित्रांच्या वस्त्या सुरु झाल्या. सुरुवातीला दगडाच्या आणि लाकडी औजारांचा वापर करून धान्यांची पेरणी करून ते धान्य पिकवू लागले. त्यानंतर हजारो वर्षांनी कृषी मध्ये धान्य पिकविण्यासाठी जनावरांचा वापर करण्यास सुरुवार झाली. जनावरांपासून मिळणाऱ्या दूध, मांस याचीही त्यांना जाणीव झाली आणि मोठ्या प्रमाणात नदीकाठची सुपीक जमीन शोधून त्या ठिकाणी धान्य घेऊ लागले आणि खऱ्या अर्थाने भटका आदिमानव शेतकरी झाला. भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेती हा देशाच्या अर्थकारणाचा कणा आहे.भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशातील बहुसंख्य जनता जर शेतीवर अवलंबुन असेल तर शेती व्यवस्थापनात देशाच्या विकासाची खरी मेख आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही तत्ववेत्याची गरज नाही.आपल्या देशाचा शेती व्यवसाय आणि शेतकरी जीवन बदलले ते स्वातंत्र्यानंतर. गेल्या ७०-७५ वर्षात अनेक गोष्टीत बदल झाला. विदर्भातील हवामान उष्ण व निन्म कोरडे अहे.या प्रदेशातील शेती सुपीक होती त्याचप्रमाणे १९६० च्या अगोदर येथील नागरी भागापेक्षा ग्रामीण परिसर समृद्ध होता. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता,हरितक्रांती नंतर पिक रचनेत मोठ्या प्रमाणावर बदल झाला पारंपारिक पिक पद्धतीतून एकल पीक,संमिश्र पीक पद्धतीकडे वाटचाल झाली. पश्चिम विदर्भात एकल पिक रचनेने क्रांती केली. मात्र कापूस पिकाची हळू हळू उत्पादन कमी व खर्च वाढत असल्याने भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून विदर्भाचे नाव प्रथम क्रमांकावर आले.त्यामध्ये यवतमाळ व वाशिम जिल्हे आघाडीवर होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्याठी शेतकरी वर्गाला अनुदान,कर्ज माफी यासारख्या अमिषाला बळी पाडले.या सर्वातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक रचनेतील बदलाचा स्वीकार केला. असे म्हणणे अतिशोक्ती ठरणार नाही.
Keywords संशोधन पद्धती,संशोधनाची उदिष्ट,संशोधनाची साधन सामग्री ,पीक रचना म्हंजणे काय,पीक रचनेतील बदल,निष्कर्ष
Field Computer > Network / Security
Published In Volume 7, Issue 1, January-February 2025
Published On 2025-01-10
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2025.v07i01.34811
Short DOI https://doi.org/g82gw8

Share this