International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 6 November-December 2024 Submit your research before last 3 days of December to publish your research paper in the issue of November-December.

शाश्वत विकास लक्ष व भारतातील भूक निर्देशांक स्थिती : एक चिकित्सक विश्लेषण

Author(s) डॉ. अतुल सं. नौबदे, श्रीमती ज्योती अ. नौबदे
Country India
Abstract जगात 2030 पर्यत शाश्वत विकास लक्ष्य साध्य करावयाचे असून त्या अनुषंगाने विविध धॊरण व नियोजन करण्याचे कार्य सर्वत्र प्रगतीपथावर आहे. अशा स्थितीमध्ये भारतातील भूक बळींची स्थिती गंभीर असल्याचा खुलासा जागतिक भूक निर्देशांक अहवालात करण्यात आलेला आहे. भारत हा कृषीप्रधान देश असूनसुद्धा भारताचा समावेश जागतिक भूक निर्देशांकानुसार गंभीर स्थितीमध्ये असणा-या देशांमध्ये होतॊ. यावर सखोल विचार करणे आवश्यक असून जागतिक भूक निर्देशांकाची व त्यांच्या गणनेसाठी विचारात घेतलेल्या उपघटकांची मागील दोन दशकातील स्थिती अभ्यासणे आवश्यक आहे. भारतातील विविध राज्यांनी शाश्वत विकासाचे शून्य भूकबळी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलेला असून त्यावरुन असे दिसून येते की, अद्याप जवळपास 45 टक्के राज्यांची प्रगती ही देशाच्या सरासरी प्रगतीपेक्षा कमी आहे. अर्थात जागतिक भूक निर्देशांकाच्या गणनेतील बालकांचे पोषण व बालकांचे वजन आणि उंची यातील विसंगती व शाश्वत विकास लक्ष्ये साध्य करण्याच्या अनुषंगाने भारतातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी केलेली प्रगती विचारात घेता भारताचा समावेश गंभीर स्थिती असणा-या देशामध्ये होऊ शकतो.
Keywords शाश्वत विकास लक्ष्ये, जागतिक भूक निर्देशांक, कुपोषण, बालमृत्यू, बालकांचे वय व वजन यातील विसंगती, बालकांचे वजन आणि उंची यांतील विसंगती, शून्य गरीबी, शून्य भूकबळी
Published In Volume 5, Issue 2, March-April 2023
Published On 2023-04-18
Cite This शाश्वत विकास लक्ष व भारतातील भूक निर्देशांक स्थिती : एक चिकित्सक विश्लेषण - डॉ. अतुल सं. नौबदे, श्रीमती ज्योती अ. नौबदे - IJFMR Volume 5, Issue 2, March-April 2023. DOI 10.36948/ijfmr.2023.v05i02.4404
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i02.4404
Short DOI https://doi.org/gsgnvr

Share this