International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 2 (March-April 2025) Submit your research before last 3 days of April to publish your research paper in the issue of March-April.

कृषी आणि संबंधित क्षेत्रातील नवोपक्रम (Innovation in Agriculture and allied Activities)

Author(s) Surwade Shubham Manohar
Country India
Abstract मानवाने सुरवातीपासून त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या जीवनात निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक कालखंडात नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरविल्या आहेत.वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक समस्या सोडवून मानवी जीवन सुखी करण्यासाठी त्याच्या नवकल्पना अधिक उपयुक्त ठरलेल्या आहेत. जेथे मानवाची बौद्धिक क्षमता अपुरी ठरली तेथे त्याने त्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला कुत्रीम बुद्धिमत्तेची (Artificial Intelligence) जोड दिली. त्यातूनच २१व्या शतकात संगणकासारख्या तंत्रज्ञान विकसित केले. त्यापुढे जावून त्याने अनेक तांत्रिक – इलेक्ट्रॉनिक उपकरणे सोधून मानवी श्रम हलके केले आणि त्या उपकरणांच्या आधारे उत्पादन क्षमता वाढवून जलद गतीने होणाऱ्या आर्थिक विकासाला चालना दिली.जीवनाच्या अनेक क्षेत्रात अशा नवकल्पनांमधून विकसित केलेल्या तंत्रज्ञान स्वरूप उपकरणांचा वापर केलेला आहे. शेती क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही.
भारत देशामध्ये देखील आज या नवनवीन कल्पनांचा म्हणजेच Computer, Smart Phone, Smart TV, Drone Smart Car, Health Devices, Smart Home Appliancesअशा अनेक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. या उपकरणांना ‘आंतरजाल’ (Internet) असे स्वरूप देण्यासाठी किंवा एकमेकांशी जोडण्यासाठी विशिष्ट स्वरूपाचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे.त्यामुळे मानवाला इलेक्ट्रोनिक उपकरणांच्या सानिध्यात राहून त्याच्या द्वारे देवाण घेवणीच्या स्वरूपात त्याचे कार्य करता येते. हेच कार्य शेतकरी देखील शेती मध्ये करू लागलेला आहे. म्हणून कृषी व्यवसायाशी संबंधित तंत्रज्ञान आणि विकसित केलेल्या उपकरण्यांच्या आधारे नवीन उपक्रम राबविल्या जात आहेतअर्थातच Innovation in Agriculture and allied Activities असे त्यास म्हटले जाते. विशेषतः भारतातील शेती हि पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. तसेच त्यातील धोके व अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक संमस्याना सामोरे जावे लागते. तसेच देशाची वाढती लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येसोबतच अन्न धान्याची वाढती मागणी , बेरोजगारी मुळे युवकांचा शेतीकडील कल ह्या सर्व गोष्टी सरकारने लक्षात घेता शेती मध्ये नवीन उपक्रम राबवणे किंवा त्यामधील नवीन कल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.
Keywords कृषी , नवोपक्रम , Innovation in Agriculture
Field Arts
Published In Volume 5, Issue 5, September-October 2023
Published On 2023-10-19
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i05.7704
Short DOI https://doi.org/gswg5z

Share this